संभाजी भिडे यांच्यासोबत जाणं म्हणजे राजकारणाच्या दृष्टीनेही आत्मघातकीपणा, छगन भुजबळ यांचा भाजपला अप्रत्यक्ष सल्ला

“संभाजी भिडे यांच्यासोबत जाणं म्हणजे राजकारणाच्या दृष्टीनेही आत्मघातकीपणा”, छगन भुजबळ यांचा भाजपला अप्रत्यक्ष सल्ला

| Updated on: Jul 30, 2023 | 2:28 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

नाशिक, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, “मनोहर भिडेंवर आम्ही सुद्धआ एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खालल्यानंतर मुलगा होईल, या वक्तव्याप्रकरणी केस झाली होती. कोर्टात ती केस ढकलली जात आहे. ज्या पद्धतीने महात्मा फुलेंवर टीका करतात, तसंच आता महात्मा गांधींवरही टीका करतात. माझी खात्री आहे की पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनाही हे आवडणार नाही. महात्मा गांधींना अख्ख जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलोय, असा क्वचित एखादा देश असेल जिथे महात्मा गांधीचा पुतळा नाही. महात्मा गांधींच्या विचारसणीला मानलं जातं, आपलंसं केलं जातं. त्या महात्मा गांधींवर किती गलिच्छ स्वरुपाची टीका करतात, त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे. त्यांच्यासोबत जाणं हे राजकारणाच्या दृष्टीनेही आत्मघातकी आहे.”

 

 

Published on: Jul 30, 2023 02:28 PM