maharashtra politics : छत्रपती संभाजी राजे यांचा वसंत मोरे यांना फोन; म्हणाले, ‘तुम्ही स्ट्राँग…’
अजित पवार यांनी आपल्या सोबत आमदारांची फौड घेत थेट भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीवरच आपला दावा सांगितला. त्यामुळे शरद पवारच आता राज्याच्या दौऱ्यावर सामान्य मतदाराच्या समोर हा प्रश्न घेऊन जात आहेत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या काका पुतण्यात पक्षावरून राडा होताना पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी आपल्या सोबत आमदारांची फौड घेत थेट भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीवरच आपला दावा सांगितला. त्यामुळे शरद पवारच आता राज्याच्या दौऱ्यावर सामान्य मतदाराच्या समोर हा प्रश्न घेऊन जात आहेत. त्यामुळे अनेकांनी राज्यात नेमकं काय सुरू हाय यावरून टीका केली आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तर राज्यात राजकारणाचा चिखल झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहत पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव…लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय… असं म्हटलं आहे. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. याचदरम्यान त्या पोस्टवरून छत्रपती संभाजी राजे यांचा वसंत मोरे यांना फोन गेला आहे. ज्यात त्यांनी मोरे यांना दम भरताना, “तुम्ही असे काही करणार नाही तुमच्यासारखी लोक ऍक्टिव्ह पाहिजेत”.”तुम्ही स्ट्रॉंग रहा” असा सल्ला छत्रपती संभाजी राजांनी वसंत मोरे यांनी दिला आहे. maharashtra politics