Sambhaji Raje | मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करणार – छ. संभाजीराजे
Sambhaji Raje | मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करणार - छ. संभाजीराजे
येत्या काही दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका जाहीर करणार, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करुनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका, ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांची भूमिका असते, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Published on: May 19, 2021 11:38 AM
Latest Videos