भावी मुख्यमंत्रीच्या चर्चेवर संभाजीराजे यांची प्रतिक्रिया, म्हणाले, ‘तुमची इच्छा…’
मविआच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागत असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांचा देखील बॅनर लागला. त्यावरून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक : राज्यात सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागण्याला उधाण आलं आहे. येथे मविआच्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागत असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांचा देखील बॅनर लागला. त्यावरून ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर यावर बोलताना, हे सगळे लोकांनी लावलेले आहेत. मी काही सांगितलेले नाही. पण हे तुमच्या मनात असल्याचं दिसत आहे. म्हणूनच हा प्रश्न विचारत आहात. तर माझ्या मनात काही नाही. माझ्या मनात फक्त शेवटपर्यंत काम करणं आहे. एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवणं आहे. मात्र तुम्हीच असे प्रश्न विचारून टिआरपी वाढवतं आहात असंही त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 25, 2023 04:21 PM
Latest Videos