नामांतराच्या समर्थनार्थ मनसेही रस्त्यावर; जलील यांना देणार उत्तर

नामांतराच्या समर्थनार्थ मनसेही रस्त्यावर; जलील यांना देणार उत्तर

| Updated on: Mar 14, 2023 | 9:02 AM

नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्युत्तर देणार

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएम पक्ष चांगलाच आक्रमक झाला. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर कॅन्डल मार्च ही काढण्यात आला. यानंतर नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्युत्तर देणार आहे. एमआयएमच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरणार आहे. याच्याआधी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात आलं होतं. आता छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ 16 मार्चला मनसेकडून मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा संस्था गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा असेल.