अंबादास दानवेंच्या टीकेला शिवसेना नेत्यांच प्रतित्युतर, म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याला राजकारणच दिसतं

अंबादास दानवेंच्या टीकेला शिवसेना नेत्यांच प्रतित्युतर, म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याला राजकारणच दिसतं

| Updated on: Mar 30, 2023 | 11:29 AM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी या राड्याला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका केली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर दोन गटात राडा झाला. त्यात पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केलं. याचदरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी या राड्याला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका केली. त्या टीकेला पालकमंत्री भुमरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

भुमरे यांनी, विरोधी पक्ष नेत्याला राजकारणच दिसतं. त्यांच कामचं आहे भाजप, शिवसेना, एमआयएम यांच्यावर आरोप करण्याचं. पण माझे आता त्यांना आवाहनं आहे की, ही परिस्थिती आरोप करायची नाही आपल्याला नागरिकांना कसे संरक्षण देता येईल? शांतता कशी निर्माण करता येईल हे काम करायला हवं. राजकारणाच्या वेळेस आपण आपलं राजकारण करू. पण रात्री जे झालं ते पक्षाचं नाही तर दोन तरुणांच्या गटात झालेला राडा होता. त्यामुळे माझं विरोधी पक्षांना सुद्धा सांगणं आहे की त्यांनी शांततेसाठी आवाहन करायला हवं.

Published on: Mar 30, 2023 11:29 AM