समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील सर्वप्रवाशांच्या जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात झालाय. मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झालाय. केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आलं. ट्रकमधील ड्रायव्हरसह इतरांना वाचवण्यात अपयश आलं. ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
Published on: Mar 04, 2023 07:38 AM
Latest Videos