मविआची सभा तर सावरकर गौरव यात्रेवरून जयंत पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले…
पाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेली दंगल ही घडवून आणलेली असावी असं म्हटलेलं आहे. तर हा लोकांचा तर्क असल्याचेही ते म्हणालेत
पुणे : छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला. त्याप्रकरणी तब्बल 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी किराडपुरा भागात असणाऱ्या राम मंदिरासमोर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होत असतानाच भाजपची सावरकर गौरव यात्रा ही आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे छत्रपती संभाजीनगवर लागले आहे.
पाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेली दंगल ही घडवून आणलेली असावी असं म्हटलेलं आहे. तर हा लोकांचा तर्क असल्याचेही ते म्हणालेत. तर मविआची होणाऱ्या या सभेला न भूतो न भविष्य असा लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणालेत. तर सावरकर गौरव यात्रेवरून बोलताना, दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊ नयेत म्हणून पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. कोणाची गौरव यात्रा असेल ती वेगळ्या रूटने जाईल आणि मविआच्या सभेला येणारे कार्यकर्ते वेगळ्या रूट येतील हे पोलिसांनी पहावं असेही ते म्हणाले.