त्यावेळी काका आणि आका होते… का नाही विचारलं; भाजप नेत्याचा अजित पवारांना टोला
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील सावरकर यांच्यावरून भाजपला विचारला होता. त्यावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर आता देण्यात आलं आहे
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही असा केला. तसाच प्रश्न विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील सावरकर यांच्यावरून भाजपला विचारला होता. त्यावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर आता देण्यात आलं आहे. भाजप नेते आमदार अशिष शेलार यांनी अजित पवार यांच्यावर निशाना साधत त्यांचे काका आणि आका हे त्यावरेळी राज्यात आणि केंद्रात सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न त्यांना का नाही विचारला असा सवाल शेलार यांनी केला आहे. तर यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर देखिल त्यांनी टीका केली. रोहित पवार यांना अभ्यास करावा लागेल. रोहित पवार तरुण तडफदार आहेत. अभ्यास न करता बोलणं हे कधीही भारी पडू शकतं असा इशाराच शेलार यांनी दिली.