भाजपच्या जनआक्रोश मोर्चावरून उद्धव ठाकरे यांचा घनाघात
यावेळी त्यांनी सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख करत जरुर काढा यात्रा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता असेही ते म्हणाले
छत्रपती संभाजीनगर : येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ जाहीर सभा पार पडली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर निशाना साधला. तर राज्यात काढण्यात येणाऱ्या भाजपच्या जनआक्रोश मोर्चावरून ठाकरे यांनी घनाघात केला. सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत; पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता पंतप्रधानपदी असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चेल का काढावे लागतात असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर निवडणुका आल्या की जातीय तेढ निर्माण करायचे प्रकार सुरू होतात. त्यामुळे जेव्हा असे प्रकार समोर येतात तेंव्हा समजा निवडणुका जवळ आल्या आहेत.
यावेळी त्यांनी सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख करत जरुर काढा यात्रा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता असेही ते म्हणाले. माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल. पण मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.