छत्रपती संभाजीनगर दंगलीवर फडणवीस यांच्याकडून आवाहन; म्हणाले, आमचं…
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, औरंगबादचा तणाव निवळला आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. आता काळजी करण्याचे कारण नाही असं म्हटलं आहे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये नामातरणाच्या वादानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल, विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी दंगलीसंदर्भात आधीच चेतावणी दिली होती. छत्रपती संभाजीनगरचे वातावरण काही लोक बिघडवत आहेत असा इशारा ही त्यांनी दिला होता. त्यानंतर येथील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिरासमोर दोन गटात राडा झाला. त्याचे रूपांतर धार्मिक दंगलीत होणार तितक्यात पोलिसांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करत लोकांनी शातंता राखा असे आवाहन केलं आहे.
येथील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिरासमोर रात्री बारा साडे बाराच्या सुमारास मुलांच्या दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. याचा फायदा काही समाजकंटकांनी उचलत पोलिसांची वाहन पेटवून दिली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. सध्यस्थितीत सगळं नियंत्रणात असून येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसआरपी फोर्स ही तैणात करण्यात आली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, औरंगबादचा तणाव निवळला आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. आता काळजी करण्याचे कारण नाही. पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना सूचना आहे की कोणी तणाव निर्माण करू नये. शांतता ठेवावी असे आवाहन छत्रपती संभाजीनगर वासियांना केलं आहे.