मुंबईत बॉम्ब स्फोट झाले तेव्हा…; फडणवीस यांच्या राजीनाम्यावर मुनगंटीवार चांगलेच भडकले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद फडणवीस यांचा राजीनामा मागीतला होता. त्यावरून आता राजकार तापत आहे. भाजप नेते वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यावरून चांगलेच भडकले
नांदेड : संभाजीनगरातील किराडपुरा भागात दोन गटात राडा झाला. दंग्यात पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या तर दगडफेक ही करण्यात आली. त्यानंतर आता येथे तणावपूर्ण शांतता आहे. यादरम्यान विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद फडणवीस यांचा राजीनामा मागीतला होता. त्यावरून आता राजकार तापत आहे. भाजप नेते वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यावरून चांगलेच भडकले. तर त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना, अमरावतीमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा गृहमंत्र्याचा राजीनामा का मागीतला नाही असा सवाल केला. अमरावतीच्या दंगलीवेळी राजीनामा मागून तूम्ही आदर्श घालून द्यायला हवा होता असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. तर मुंबईत बॉम्ब स्फोट झाले तेव्हा तुमचे वडील मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी दिला होता का राजीनामा असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तर या दंगलीचा सध्या खोलवर तपास सुरू आहे. त्या तपासात आपला कोणी निघेत म्हणूनच फडणवीस यांचा राजीनामा मागीतला जातोय असेही मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे.