“XX वर लाथ घालण्याची सुरुवात संजय शिरसाटांनी चंद्रकांत पाटलांपासून केली पाहिजे”
Chhatrapati Sambhajinagar News : XX वर लाथ घालण्याची सुरुवात शिरसाटांनी चंद्रकांत पाटलांपासून केली पाहिजे, अंबादास दानवे यांचं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली. संजय राऊत यांच्या XXवर लाथ मारली पाहिजे, अशी टीका संजय शिरसाट यांनी काल केली होती. संजय शिरसाट यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. शिरसाट यांच्या या वक्तव्यावर बोलताना ठाकरेगटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केलीय. सोबतच एक सल्लाही दिलाय. XXवर लाथ घालण्याची सुरुवात संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत पटलांपासून केली पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 13, 2023 11:38 AM
Latest Videos