अमित शाह चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज? चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Chandrashekhar Bawankule : अमित शाह चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
छत्रपती संभाजीनगर : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा होतेय. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांचा कुणालाही फोन आलेला नाही. ना मला आणि ना आशिष शेलार यांना… आशिष शेलार दिल्लीला गेले असतील तर त्यांचं काही वेगळं काही काम असेल. भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला याबाबत काहीही सूचना केलेली नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची करत नाहीत, असं म्हणणं हा विपर्यास आहे. त्यांनी वेगवेगळे भाग वाटून घेतले आहेत. त्यानुसार ते फिरत आहेत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
Published on: Apr 12, 2023 11:12 AM
Latest Videos