अजित पवार लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कॉन्फिडन्स
अजित पवार महायुतीचा भाग होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यानं केला आहे. संजय शिरसाट यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. पाहा...
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार भाजपत जाणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून होत आहे. त्यावर खुद्द अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीचं काम करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. पण या सगळ्या चर्चांवर शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणारच आहेत, असं संजय शिरसाठ म्हणाले आहेत. एक तारखेच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांची खुर्ची दिसणार नाही, असा खळबळजनक दावा संजय शिरसाठ यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
Published on: Apr 25, 2023 12:50 PM
Latest Videos