धक्कादायक! पोषण आहारात उंदीर; अन् तोही सडलेला, कुठं आली घटना उघडकीस?
पोषण आहाराच्या धान्यात किडे, पाली, झुरळ किंवा अळ्या सापडत होत्या. आता मात्र धक्कादायक प्रकार समार आला असून येथील सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असणार प्रकार उघड झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : पोषण आहार मुलांच्या पोषणासाठी आहे की त्यांच्या अरोग्यावर परिणाम करणार असाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे. कारण याच्याआधी पोषण आहाराच्या धान्यात किडे, पाली, झुरळ किंवा अळ्या सापडत होत्या. आता मात्र धक्कादायक प्रकार समार आला असून येथील सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असणार प्रकार उघड झाला आहे. येथे आलेल्या पोषण आहाराच्या धान्यात भलामोठा उंदीर निघाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे हे 9 महियांच्या लाभार्थी बालकास देण्यात येणाऱ्या धान्याच्या पाकिटमधून समोर आली आहे. यावेळी या गव्हाच्या पॉकेटमध्ये मृत अवस्थेत उंदीर आढळून आला आहे. याबाबत संबधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Published on: Apr 27, 2023 10:45 AM
Latest Videos