अधिकाऱ्याने 12 % वाटा मागितला, दोन लाख रुपये उधळले; 25 वर्षीय सरपंचाची राज्यभर चर्चा

अधिकाऱ्याने 12 % वाटा मागितला, दोन लाख रुपये उधळले; 25 वर्षीय सरपंचाची राज्यभर चर्चा

| Updated on: Apr 01, 2023 | 7:44 AM

एका युवा सरपंचाची सध्या राज्यभर चर्चा होतेय. गेवराईमधल्या पायगा गावातील सरपंचाने लाच मागितली म्हणून आक्रमक होत आंदोलन केलं. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : राजकारण सध्या बदलत आहे. भ्रष्ट व्यवस्थेला सामोरं जाण्याची पद्धतही बदलते आहे. एक युवा सरपंचाची सध्या राज्यभर चर्चा होतेय. गेवराईमधल्या पायगा गावातील सरपंचाने लाच मागितली म्हणून आक्रमक होत आंदोलन केलं. गेवराई पायगा इथल्या सरपंचाने लाच देण्यासाठी आणलेले 2 लाख रुपये उधळून आंदोलन केलं. फुलंब्री पंचायत समितीसमोर या तरूण सरपंचाने पैसे उधळत आंदोलन केलं. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत आंदोलन करण्यात आलं. विहिरीसाठी अधिकारी पैसे मागत असल्यामुळे नोटा उधळत आंदोलन केल्याचं या सरपंचाने सांगितलं. मंगेश साबळे असं नोटा उधळून आंदोलन करणाऱ्या सारपंचाचं नाव आहे. “विहीरीला मंजूरी द्यायची असेल तर 12 द्यावेच लागतील. गरीब असो की श्रीमंत आम्ही ही टक्केवारी घेतोच, अशी मागणी अधिकाऱ्याने केली. त्यानंतर मला या सगळ्या व्यवस्थेचा राग आला.त्यामुळे मी आंदोलन केलं”, असं मंगेश साबळे या सरपंचाने सांगितलं.

Published on: Apr 01, 2023 07:42 AM