पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा, ईडीची छापेमारी
महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी याप्रकरणी समर्थ कन्स्ट्रक्शन अँड जे.व्ही, इंडो लग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस आणि सहयोगी कंपन्यांविरोधात तक्रार दिली होती.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर इथं पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ईडीकडून शहरातील तीन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी याप्रकरणी समर्थ कन्स्ट्रक्शन अँड जे.व्ही, इंडो लग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस आणि सहयोगी कंपन्यांविरोधात तक्रार दिली होती.
या तिन्ही कंपन्यांनी एकाच संगणकावरून निवेदा भरल्याने महानगरपालिकेच्या निविदा संहितेतील अटी शर्तीचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्यांची आर्थिक क्षमता नसल्याने महापालिकेचा पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नावर पाणी पडले होते.
याप्रकरणी गृहनिर्माण विभागाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर समिती निर्माण करून चौकशी करण्यात आली. या प्रकल्पात 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
त्यामुळे ईडीमार्फत चौकशी सुरू होऊ शकते असे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. त्यातच आज ईडीकडून शहरातील तीन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे