धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं... हे काम; नाना पटोलेंची भाजपवर टीका

धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं… हे काम; नाना पटोलेंची भाजपवर टीका

| Updated on: Mar 30, 2023 | 1:37 PM

छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाना साधताना, धर्माधर्मामध्ये भांडण लावणे आणि मुळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका केली आहे

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिर परिसरात जोरदार राडा झाल्यानंतर विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच या या राड्यामागे भाजप एमआयएमचा हात असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाना साधताना, धर्माधर्मामध्ये भांडण लावणे आणि मुळ प्रश्न डायव्हर्ट करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका केली आहे. तर जनतेनं तसं न करता संविधानाने दिलेल्या समतेच्या, बंधुत्वतेच्या विचाराने गोविंदाने रहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.