छत्रपती संभाजीनगर राड्यावरून संजय राऊत आणि संजय शिरसाट आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर राड्यावरून संजय राऊत आणि संजय शिरसाट आमने-सामने

| Updated on: Mar 31, 2023 | 11:30 AM

संजय राऊत यांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी पलटवार करताना, राऊत हे मुर्ख आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारन गरम होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात काही ठिकाणी दोन गटांमध्ये राडे झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर मधील राड्यात पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. मुंबईतल्या मालवणी परिसरात देखील असाच राडा झाला. त्याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांच्या याच टीकेवर शिवसेना नेते संयज शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी राड्यावरून बोलताना, या सगळ्या दंगली ठरवून केल्या जात आहेत असा आरोप शिंदे-फडणवीस सरकारवार केला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी पलटवार करताना, राऊत हे मुर्ख आहेत असं म्हटलं आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राजकारन गरम होण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 31, 2023 11:30 AM