डाव उलटा पडेल उद्या आम्ही ही सत्तेवर येऊ, तेव्हा पोलिसांना उत्तरे द्यावी लागतील : संजय राऊत यांचा इशारा
गृहमंत्र्यांचं अस्तित्वात दिसत नाही. त्यांच अस्तित्त्व हे केवळ विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्यापुरतंच दिसतय अशी टीका राऊत यांनी केली आहे
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तर 2 एप्रिलला संभाजीनगरमध्ये मविआच्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून हे सगळे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. रामनवमीच्या मिरवणुकांवर कधीही हल्ले झाले नाहीत. या होणाऱ्या हल्ल्यावरून राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला.
यावेळी त्यांनी, गृहमंत्र्यांचं अस्तित्वात दिसत नाही. त्यांच अस्तित्त्व हे केवळ विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्यापुरतंच दिसतय अशी टीका केली आहे. तर गृहमंत्र्यांचं अस्तित्वात हे विरोधकांवर खोटे खटले दाखल करण्याचे आदेश देण्यासाठीच आहे. मात्र हे ही आदेश सध्या मुख्यमंत्री देत आहेत असा टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. विरोधी पक्षाचे प्रमुख लोकांच्यावरती खोट्या कारवाई, जुनी काही प्रकरणं उकरून काढत नवीन खटले दाखल करण्यात गृहमंत्र्यांचं अस्तित्वात असल्याचेही राऊत म्हणाले. पण डाव उलटा पडेल उद्या आम्ही ही सत्तेवर येऊ. तेव्हा तुम्हाला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. खास करून पोलिसांना असा इशारा ही त्यांनी दिला.

प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले

टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
