वाघनखं अजून ब्रिटनमध्येच मात्र राज्यात राजकारण सुरू, वाघनखं शिवकालीन की महाराजांनी वापरलेली?; बघा स्पेशल रिपोर्ट
tv9 marathi Special Report | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटनच्या संग्रहालयात असणारी वाघनखं भारतात येणार मात्र ती वाघनखं शिवकालीन की शिवरायांनी वापरलेली? यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद पेटला, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, 2 ऑक्टोबर 2023 | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांवरून सध्या राजकारणात चांगलाच ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार ब्रिटनवरून आणत असलेली वाघनखं शिवरायांनी वापरलेली आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर यावरून राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण होत असल्याने ब्रिटनमध्ये असलेली वाघ नखं भारतात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न आहे. पण आता यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतकंच नाहीतर यावरून चांगलंच राजकारण होताना दिसतंय. आदित्य ठाकरे यांनी यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी बालबुद्धीवर जोरदार पलटवार केलाय. वाघनखं भारतता आणून तुम्ही दिल्लीची गुलामीच करणार आहात, असा टोला संजय राऊत यांनी सरकारला लगावला. तर सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना त्यांच्याच एका वक्तव्याची आठवण करून देत प्रत्युत्तर दिलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट