जगात काहीही चोरलं जाऊ शकतं, पण ‘या’ दोन गोष्टींची चोरी होऊच शकत नाही!; शिवसेनेच्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये केलेले वक्तव्य तपासून पाहिले पाहिजे आम्ही कुणाचेही काही चोरले नाही. आम्ही नेहमीच फक्त आमची नाराजी व्यक्त केली आहे, असं शिवसेना नेत्यानं म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये काल सभा झाली. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे महाविकास आघाडीचा मेळावा वाटत होता. मालेगावची सभा उद्धव ठाकरे यांच्या नावावर असली तरी ती सभा हिंदुत्वाची भूमिका मांडणारी सभा वाटत नव्हती”, असं संजय शिरसाट म्हणालेत. जगात कशाचीही चोरी होऊ शकते. पण माणसं आणि विचार चोरीला जाऊ शकत नाहीत. आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूला जे लोक आहेत ते त्यांचे कधीच नव्हते. उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेली माणसं 40-45 वर्षे काम केलेले आहेत, असंही शिरसाट म्हणालेत.
Published on: Mar 27, 2023 07:35 AM
Latest Videos