Special Report | मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच!

Special Report | मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच!

| Updated on: Jul 01, 2022 | 10:15 PM

सर्वप्रथम बच्चू कडू यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे म्हणून मागणी केलेय. ते राज्यमंत्री असताना शिक्षण,महिला व बालकल्याण खातं त्यांच्याकडे होते. तर जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास खात्याची मागणी करून कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोर करून उद्धव ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथ विधी झाला त्यानंतर मात्र बंडखोर आमदारांमधून आपल्यालाही मंत्रि पद मिळावे याची मागणी होऊ लागली. त्यामध्ये सर्वप्रथम बच्चू कडू यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावे म्हणून मागणी केलेय. ते राज्यमंत्री असताना शिक्षण,महिला व बालकल्याण खातं त्यांच्याकडे होते. तर जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास खात्याची मागणी करून कॅबिनेट मंत्री पदाची मागणी केली आहे. संदीपान भुमरे कॅबिनेट मंत्री होते,रोजगार, हमी योजना, फलोत्पदन खाती त्यांच्याकडे होती, त्यामुळे आताही त्यांना कॅबिनेट खातं मिळण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यामुळे आपल्या मंत्रीपद मिळणार नसल्याचे संजय शिरसाठ यांनी वाटत आहे त्यामुळे त्यांनीही आता मंत्रिपदाची मागणी केली आहे. तर रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम, उदय सामंत, संजय राठोड, प्रताप सरनाईक, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांनाही आता मंत्रिपद मिळणार आहे मात्र कोणते मंत्रिपद मिळणार हे मात्र आता येणार काळच ठरवणार आहे.

Published on: Jul 01, 2022 10:15 PM