Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना भान राखावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला

Eknath Shinde : राज्यपालांनी बोलताना भान राखावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सल्ला

| Updated on: Jul 30, 2022 | 5:52 PM

मराठी माणसांच्या मेहनतीमुळं मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या (Bhagat Singh Koshyari) वक्तव्यावर आपण सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. मराठी माणसामुळं मुंबईमध्ये (Mumbai) वैभव निर्माण झालं. मराठी माणसांच्या मेहनतीमुळं मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज्यपालांचं विधान हे वैयक्तिक आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान हे कोणी नाकारू शकत नाहीत. राज्यपाल हे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळं कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे, असंही ते म्हणाले. मराठी माणसामुळं खऱ्या अर्थानं मुंबईला वैभव प्राप्त झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Published on: Jul 30, 2022 05:40 PM