182 गावांची प्रतिक्षा 53 वर्षांनी थांबणार? पायला पाणी आणि किमान 70 हजार हेक्टर जमीनीवर पिकही डोलणार, निळवंडे धरणाच्या उद्घाटनाचा मुहूर्त आज
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अकोलेसह, सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे सुमारे 53 वर्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या 182 गावांची तहान आता जाऊन भागणार आहे.
अकोले /अहमदनगर : बहुप्रतीक्षित असणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्प हा तब्ब्ल 53 वर्षांनंतर पूर्णत्वास गेला आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अकोलेसह, सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे सुमारे 53 वर्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या 182 गावांची तहान आता जाऊन भागणार आहे. त्यातबरोबर या प्रकल्पामुळे सुमारे 68000 हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीत एकच आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. 8.32 टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या या बांधकामाला 1970 मध्ये हा प्रकल्प महालादेवी या नावाने मंजूर मिळाली होती. ज्याचा त्यावेळी खर्च अंदाजे 8 कोटी होता. जो अता 5 हजार कोटींच्या बाहेर गेला आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते डाव्या कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी केली जाणार आहे. ज्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर मधील सहा गावे असे एकूण 182 गावांमधील पाणी प्रश्न मिटणार आहे