समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; मृतांच्या कुटुंबांना 5 लाख; जखमींवर सरकार उपचार करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद असल्याचे म्हटलं आहे. तर अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका काही थांबलेली नाही. आता या महामार्गावर सगळ्यात मोठी दुर्घटना झाली आहे. या महामार्गावर बुलढाण्यात भीषण बस अपघात झाला आहे. ज्यात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. ज्यामुळे अख्ख राज्य सुन्न झाले आहे. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ झाला आहे. ज्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद असल्याचे म्हटलं आहे. तर अपघात कशामुळे झाला, नेमकं काय घडलं, याची चौकशी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. तर जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून त्याचा खर्च राज्य शासन करेल. तर या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल अशीही घोषणा शिंदे यांनी केली.
Published on: Jul 01, 2023 11:33 AM
Latest Videos