केवळ मतं टाकणारे मशीन म्हणून आम्ही कोणाकडे बघत नाही; केसरकरांचं सडेतोड उत्तर
मंत्री दीपक केसरकर यांनी, हिंदुत्व किंवा रामराज्य हे खूप व्यापक आहे. भारताच्या भूमीवर आणि हिंदुस्तानवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर असून ते रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी राज्यात आणि देशात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळं केलं जात असलायचं म्हटलं आहे. त्यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी, हिंदुत्व किंवा रामराज्य हे खूप व्यापक आहे. भारताच्या भूमीवर आणि हिंदुस्तानवर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक मग तो कुठल्याही धर्माचा असो तो हिंदूच आहे. आम्ही त्याला हिंदूच म्हटलं पाहिजे. आम्ही जातीभेद करत नाही, जातिभेद करून त्यांची मत मिळवणाऱ्या केवळ ती मतं टाकणारी मशीन वाटतात. पण आम्ही कोणाकडे तसं बघत नाही. पण हे गेल्यावेळी मतदारांच्या लक्षात आलं आहे. त्यांचा गैरवापर होतोय हे ही त्यांना कळलेलं आहे. त्यामुळेच मोदींच्या नेतृत्वावर जनता खुश आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काम करणार आहोत. महाराष्ट्राला त्याचं गतव्य प्राप्त करून देणार आहोत.