एकनाथ शिंदे यांची क्रेझ फक्त महाराष्ट्र पुरती नाही तर…; उदय सामंत यांच्याकडून गुणगान
मंत्री उदय सांमत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा दौरा दोन्ही राज्यातील लोकांसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील उत्तर भारतीय जनता आणि उत्तर भारतातील मराठी भाषीकांना सुखसोई कशा या संदर्भात दोन्ही मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर असून ते रामलल्लाच्या दर्शनाला गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे आमदार खासदार, मंत्री मंडळातील काही मंत्री आणि भाजपचे नेते गेले आहेत. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर मंत्री उदय सांमत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा दौरा दोन्ही राज्यातील लोकांसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील उत्तर भारतीय जनता आणि उत्तर भारतातील मराठी भाषीकांना सुखसोई कशा या संदर्भात दोन्ही मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल. याच्या आधीच्या दौऱ्याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी अस काही झालं नव्हतं. पण काल एअरपोर्टवर यूपीच्या लोकांनी एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत केलं. यामुळे एकनाथ शिंदे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत तर त्यांची क्रेझ देशामध्ये आहे. त्यांना मानणारा वर्ग देशामध्ये तयार झालेला आहे असे ते म्हणाले.