हा एक प्रश्न दिवसाचा, तर मागील अडीच वर्षांमध्ये फक्त राजकीय घोषणाच झाल्या; शिवसेना नेत्याचा पवारांना टोला
सामंत यांनी त्यांच्या या टीकेत काही तथ्य नाही. हा प्रश्न फक्त एकाच दिवसाचा आहे. आम्ही संध्याकाळीच महाराष्ट्रात परतणार आहोत.
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाताना संपूर्ण मंत्रीमंडळ नेलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपच्या मंत्र्यांसोबत तेथे गेले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. पवार यांनी, महत्त्व कशाला द्यायचं? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला? त्यांची श्रद्धा अयोध्येत असेल तर आमची श्रद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे, असं म्हणाले होते. त्यावरून उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सामंत यांनी त्यांच्या या टीकेत काही तथ्य नाही. हा प्रश्न फक्त एकाच दिवसाचा आहे. आम्ही संध्याकाळीच महाराष्ट्रात परतणार आहोत. तर राहिला प्रश्न शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा. तर बजेटमध्ये यासंदर्भात तरतुदीत बघा. मागच्या अडीच वर्षांमध्ये फक्त राजकीय घोषणाच झाल्या. शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनची घोषणा झाली. पण ते आम्ही दिले. शेतकऱ्यांसोबत आम्ही आहोत. शेतकऱ्यांवर कुठे अन्याय होणार नाही. कॅबिनेटमध्ये देखील तसे निर्णय झालेत.