आरोग्यसेवेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, हा बदल लवकरच दिसेल
राज्यात सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक देखील आली पाहिजे. पंधराव्या वित्त आयोगाने दिलेला निधी पुढील मार्चपर्यंत खर्च झालाच पाहिजे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील अपेक्षित खर्च देखील झाला पाहिजे
मुंबई : 9 ऑक्टोबर 2023 | राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी बैठक होती या मध्ये रुग्णांनाचि संख्या हॉस्पिटल आणि बेड आणी खाटांची कॅपॅसिटी या संदर्भात बैठक झाली. सिव्हिल हॉस्पिटल बद्दल होणारे विलंब आणि होणारी गैरसोय यासाठी 25 ठिकाणी नवीन सिव्हिल हॉस्पिटल करण्याचे योजले आहेत. मनुष्यबळ भरण्याची चर्चा झाली आहे. सगळी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे आहेत. नर्सिंग कोर्स आणि परमेडिकल देखील करायचे ठरले. या चर्चेतून आरोग्य विभागाला दुप्पट बजेट खरंच झाला तर तो सरकार कडून देण्यात येईल. महाराष्ट्रातील रुग्णांन आम्ही योग्य प्रकारे सेवा देऊ. 2 कोटी हेल्थ कार्ड देण्याचं ठरवलं आहे त्यातून मोठा फायदा हा होणार आहे. जिल्हाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. रुग्णांची योग्य सेवा केली जाईल. आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.