VIDEO | ‘शिंदे यांच्या 5 मंत्र्यांना डच्चू? की बक्षीस म्हणून बढती मिळणार?’; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका
सध्या शिंदे यांच्यावर केंद्रातून दबाव असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याचदरम्यान मंत्र्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलवली होती. त्यानंतर उलट सुलट चर्चांना उधान आलं.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार मंत्र्यांना हटवण्याचे आदेश केंद्रातून देण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शिंदे यांच्यावर केंद्रातून दबाव असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याचदरम्यान मंत्र्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलवली होती. त्यानंतर उलट सुलट चर्चांना उधान आलं. यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे आणि शिंदे गटावर तोफ डागत टीका केली आहे. त्यांनी, आधीही मी म्हणालो होतो की, कर्नाटकातले ह्यांचे सरकार जर 40% वाले असेल तर महाराष्ट्रातले सध्याचे घटनाबाह्य सरकार 100% भ्रष्टाचारी आहे, आर्थिकदृष्ट्याही आणि नैतिकदृष्ट्याही! असे ऐकण्यात आले आहे की, गद्दार गँग पैकी 5 मंत्र्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्याची आज्ञा देण्यात आली आहे. त्यांच्या सहकारी पक्षातील कोणी सांगू शकेल का, हे खरे आहे की खोटे? गद्दार भ्रष्टाचारी आहेत हे खरंच आहे, फक्त त्यांना काढून टाकण्यात येणार आहे की भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटल्याबद्दल बक्षीस म्हणून बढती मिळणार आहे, एवढंच जनतेला जाणून घ्यायचंय! असं ट्विट करत त्यांनी टीका केली आहे.