‘मानस बे भरोशाची असतात’; मुख्यमंत्री शिंदे यांची नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका
शरद पवार यांनी नाशिक येथील येवला मतदारसंघात सभा घेत अजित पवार यांच्यासह बंडखोरांवर जोरदार निशाना साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली.
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर एकीकडे शरद पवार हे राज्याच्या दौरा करत आहेत. तर त्यांनी नाशिक येथील येवला मतदारसंघात सभा घेत अजित पवार यांच्यासह बंडखोरांवर जोरदार निशाना साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. याचदरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोलीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रमात सुरू होता. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावेळी शिंदे यांनी, कष्ट करणाऱ्या आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय झाला तर मग अजित पवारांसारखा प्रसंग होतो अशे म्हटलं आहे. तर घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे कधिही चांगले अशी घणाघाती टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर शरद पवार यांच्यावर जहरी टीका करताना, तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेली मानस बे भरोशाची असतात. त्याचं काय करायचं हे अजित पवार यांना बरोबर कळतं अशी शिंदे यांनी यावेळी केली आहे.