एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का मानखाली घालून खुदूखुदू हसले ?

एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’वक्तव्यावर अजितदादा का मानखाली घालून खुदूखुदू हसले ?

| Updated on: Oct 16, 2024 | 5:53 PM

राज्यात निवडणूकांचे बिगुल वाजले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीने आज पत्रकार परिषद घेत आपल्या अडीच वर्षांच्या काळातील रिपोर्ट कार्ड सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीवरुन एकनाथ शिंदे यांनी नक्कल करताच अजितदादांना हसु आले. त्यावर उपस्थितांत काय चर्चा झाली ती पाहा...

महाराष्ट्रात अखेर निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात आता आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. यानंतर कोणताही शासकीय निर्णय जाहीर होणार नाही. आज महायुतीने आपली पत्रकार परिषद घेत आपल्या सरकारच्या कामाचे रिपोर्टकार्ड सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे तिन्ही पक्षाचे प्रमुख हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्या सरकारने कशी सढळहस्ते मदत केली त्याबद्दल माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन ते तीन कोटी निधी दिला होता. आणि साडे तीनशे कोटी रुपये गरजूंना वैद्यकीय मदत दिली.कोणाचे आहेत हे पैसे ? जनतेचे ते पैसे होते. ते जनतेच्या कामासाठी दिले. तुमचे मुख्यमंत्री सहीसाठी पेन उचलायचे नाही. पेनच वापरायचे नाही असं म्हणत मुख्यमंत्री यांनी पेपर टेबलावर टाकून नक्कल करुन दाखविली त्यावेळी अजितदादा मान खाली खालून खुदूखुद हसत होते. पत्रकारांना अजितदादा हसत आहेत असे सांगितले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले दादा साक्षीदार होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की ‘साक्षीदार आणि भुक्तभोगी’! एकनाथ शिंदे त्यावर म्हणाले की दादा बरोबर पेन चालवत होते असे म्हणतात एक हशा उडाला.

Published on: Oct 16, 2024 05:53 PM