Vishwajit Kadam | Shinde-Fadnavis सरकारने गोविंदा पथका बाबत घेतलेल्या निर्णयावर विश्वजित कदम म्हणतात -tv9

Vishwajit Kadam | Shinde-Fadnavis सरकारने गोविंदा पथका बाबत घेतलेल्या निर्णयावर विश्वजित कदम म्हणतात -tv9

| Updated on: Aug 21, 2022 | 11:07 AM

आमदार विश्वजीत कदम यांनी देखील इतर खेळाडूंच्या भावनांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी विचार करावा आणि ते करतील अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांना दिलेल्या नोकरीच्या आरक्षणावरून आता चांगलाच गदारोळ होताना दिसत आहे. राज्यात विविध ठिकाणी या संदर्भात तीव्र आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष नेते तसेच अनेक जणांनी या संदर्भात आपली मते मांडलेली आहेत. याचदरम्यान आमदार विश्वजीत कदम यांनी देखील इतर खेळाडूंच्या भावनांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी विचार करावा आणि ते करतील अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. त्याचबरोबर कदम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी दहीहंडीचा साहसी खेळात सामाविष्ट केल्याने या खेळाला एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पाय उचलल्याचे म्हटलं आहे. मात्र महाराष्ट्रातल्या पारंपारिक खेळामध्ये इतर खेळाडूंचे सुद्धा प्रचंड मोठे योगदान आहे. त्यांचाही भविष्यकाळात कुठल्या ना कुठल्या मार्गातून विचार करण्यात यावा असेही म्हटलं आहे.

 

Published on: Aug 21, 2022 09:56 AM