आधी टीका आणि नंतर एकाच मंचावर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा हसत मुखत कार्यक्रम
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या विधानावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या
पुणे : राज्यात वादग्रस्त विधानावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. शिंदे, फडणवीस आणि पवार हे येथे आयोजित महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आणि उपमुख्यमत्री फडणवीस यांनी अजित पवार यांना घेरलं होतं. तर महापुरूषांवर बोलताना विचार करून बोलावं असे मुख्यमंत्री यांनी अजित पवार यांना टोला लगावला होता. त्यानंतर आपल्या विरोधातील हे राजकार भाजप करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. तसेच त्यांच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानांवरून लक्ष बाजूला करण्यासाठीच हे आरोप केले जात आहेत असेही ते म्हणाले होते.
त्यांनतर आता एकाच व्यासपीठावर हे तिघे आल्याने एकच धक्का अनेकांना बसला आहे. मात्र यावेळी टीकास्त्र सोडणारे आज हसतमुखत बसले होते. तर महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष हे अजित पवार आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.