लोकांची कशी सेवा करावी हे आम्हाला शिकण्याची गरज नाही; पवारांच्या टीकेला केसरकरांच प्रत्युत्तर
त्यांचे सरकार असं करत होतं. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत झाली कधीही झालेली नाहीये. केवळ तोंडाने बोलायचं आणि शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. भूविकास बँकेचा प्रश्न कितीतरी दिवस पडलेला होता. तो आम्ही सोडवला
अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील आमदार, खासदार आणि भाजपचे काही नेते हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक संकट आहे, काही ठिकाणी पाऊस पडत आहे. अशा वेळी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून हे अयोध्या दौरा करत आहेत. त्यांच्या या टीकेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पलटवार करताना आम्ही आम्ही कधीही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं नाहीये.
त्यांचे सरकार असं करत होतं. आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत झाली कधीही झालेली नाहीये. केवळ तोंडाने बोलायचं आणि शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. भूविकास बँकेचा प्रश्न कितीतरी दिवस पडलेला होता. तो आम्ही सोडवला. न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्यामुळे लोकांची कशी सेवा करावी हे आम्हाला शिकण्याची गरज नाही. आम्ही ते करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्राला राम राज्य जर बनवायचं असेल, महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आम्ही ज्या देवतेवर विश्वास ठेवतो, त्या श्रीरामाची आम्ही पूजा केली त्यामध्ये काय बिघडलं असा सवाल ही त्यांनी केला आहे.