अयोध्या दौऱ्यावर घोडे गाड्या घेऊन गेलेत, नुसता तमाशा; शिवसेनेच्या नेत्याचा शिंदेंना टोला

अयोध्या दौऱ्यावर घोडे गाड्या घेऊन गेलेत, नुसता तमाशा; शिवसेनेच्या नेत्याचा शिंदेंना टोला

| Updated on: Apr 10, 2023 | 7:19 AM

एकनाथ शिंदे हे दोन दिवसापासून अयोध्या दौऱ्यावर घोडे गाड्या घेऊन गेलेत हा नुसता तमाशा सुरू आहे असाही घणाघात त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले परंतु यांचा असा थाट आहे की जसे काय यांनीच राम मंदिर निर्माण केले

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांचा आयोध्या दौरा हा पर्यटन असल्याची टीका केली होती. यानंतर आता ठाकरे गटाच्याच एका माजी खासदारानं या दौऱ्यावरून शिंदेंना लक्ष करत टीका केली आहे. मी कडवट हिंदुत्ववादी आणि धार्मिक आहे. परंतु काम सोडून मी देवदर्शनासाठी जात नाही अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी शिंदे यांच्यावर केली आहे. तर एकनाथ शिंदे हे दोन दिवसापासून अयोध्या दौऱ्यावर घोडे गाड्या घेऊन गेलेत हा नुसता तमाशा सुरू आहे असाही घणाघात त्यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर निर्माण केले परंतु यांचा असा थाट आहे की जसे काय यांनीच राम मंदिर निर्माण केले. तर एकनाथ शिंदे यांचे वागणे म्हणजे “मूह राम बगल मे छुरी”. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. जे उद्धव ठाकरे यांचे झाले नाही श्रीरामाचे काय होणार, असा सवाल ही त्यांनी केला आहे.

Published on: Apr 10, 2023 07:19 AM