kolhapur violence : कोल्हापूर राड्यावर मुख्यमंत्री शिंदे याचे आवाहन; कठोर कारवाईचाही इशारा
शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. यादरम्यान धक्काबुक्कीचा प्रकार घडला आणि पोलीसांनी लाठीचार्ज केला. यावरून सध्या कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
कोल्हापूर : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. त्यानंतर येथील शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. यादरम्यान धक्काबुक्कीचा प्रकार घडला आणि पोलीसांनी लाठीचार्ज केला. यावरून सध्या कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. याचदरम्यान कोल्हापुरात शांतता राखावी, शहरात शांतता निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आवाहन केले. तसेच कोल्हापुरातील अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.