Maharashtra Politics Crisis : ‘…आता सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार’; अजित पवार यांच्या शपथ विधीवर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आलं होतं. मात्र अजित पवार यांनी आज वेगळीच खेळी करत थेट उपमुख्यमंत्री पदच आपल्या पदरात पाडून घेतलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते पद नको पक्षाची जबाबदारी द्या अशी मागणी सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आलं होतं. मात्र अजित पवार यांनी आज वेगळीच खेळी करत थेट उपमुख्यमंत्री पदच आपल्या पदरात पाडून घेतलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ विधीनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, महाराष्ट्रातील सरकारला आता ट्रिपल इंजिन मिळाले आहे. आता सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणार असल्याचं सांगत अजित पवार यांच्या अनुभव फायद्याचा ठरेल असं वक्तव्य केलं आहे.
Published on: Jul 02, 2023 04:42 PM
Latest Videos