‘त्या काळात लोकमान्य टिळक आणि आता पंतप्रधान मोदी हे सामन्य माणसाच्या मनातील भावना ओळखणारे नेते’: शिंदे
यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आणि टिळक परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार दिल्याबाबत ट्रस्टचे आभार मानले. तर मोदी यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक देखील केले.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांचा हा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह आणि टिळक परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार दिल्याबाबत ट्रस्टचे आभार मानले. तर मोदी यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे कौतुक देखील केले. यावेळी शिंदे यांनी, स्वातंत्र्याच्या काळात सामन्य माणसाच्या मनातील भावना लोकमान्य टिळक ओळखत होते. तर आजच्या या काळात पंतप्रधान मोदी हे सामन्य माणसाच्या भावना ओळखतात. त्यामुळेच ते राष्ट्रीय स्तरावरील नेते बनले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 9 वर्षात जे काम केलं त्या कामांची पोचपावती म्हणून लोकमान्यताच आज मिळाल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी टिळकांनी स्वराज्यासाठी लढा दिला, मात्र त्यानंतर मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यकरण्यामध्ये किती यश आलं, आपल्या सर्वांना माहिती असल्याचेही शिंदे म्हणाले.