अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे यांचा विरोधकांना गर्भीत इशारा; म्हणाले, ‘असं बोलू नका, नाहीतर’

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच शिंदे यांचा विरोधकांना गर्भीत इशारा; म्हणाले, ‘असं बोलू नका, नाहीतर’

| Updated on: Jul 17, 2023 | 9:49 AM

त्याच्याआधी विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारवर टीका केली.

मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्याच्याआधी विरोधकांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच सरकारवर टीका केली. याच टीकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना गर्भीत इशारा देत सुनावले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली मते मांडली आहेत. यावेळी शिंदे यांनी, सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल अशी ग्वाही देतीना विरोधकांवर टीका केली. तसेच त्यांनी विरोधकांना सूचक इशारा देताना, विरोधक माध्यमांत दररोज म्हणतात सरकार जाईल, पडेल, पण आता एकव वर्ष झाला हे सरकार अजूनही आहे. तेव्हा म्हणायचे सरकार पडेल-पडेल पण आता अजित पवार ही आलेत त्यामुळे हे सरकार अधिक-अधिक मजबूत आहे. त्यामुळे आता सरकार पडेल असं बोलू नका, नाहीतर आणखी काहीतरी होईल.

Published on: Jul 17, 2023 09:49 AM