आधी 400 वर होती नंतर 40 वर आली आणि आता…; मुख्यमंत्री शिंदे यांची काँग्रेसवर टीका
महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना सिमाभागात येऊ नये असे पत्र दिले होतं. मात्र असं असतानाही ते भाजपच्या प्रचारात उतरले आहेत. त्यावरून विरोधकांना त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर शिंदे हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रचाराला गेले आहेत.
बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. याच्याआधीच यावर सडकून टीका विरोधकांनी केली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना सिमाभागात येऊ नये असे पत्र दिले होतं. मात्र असं असतानाही ते भाजपच्या प्रचारात उतरले आहेत. त्यावरून विरोधकांना त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर शिंदे हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रचाराला गेले आहेत. यावळी शिंदे यांनी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. त्यांनी काँग्रेसवाले पंतप्रधान यांच्यावर सतत टीका करतात. आता ही त्यांनी टीका केली आहे. मात्र पंतप्रधान शांत राहतात. ते काहीच बोलत नाहीत. ते सुड घेत नाहीत. पण जनता शांत बसणारी नाही. जनतेनं सुड घेतला. मोदींवर टीका करणाऱ्यावर सूड घेतला. काँग्रेस आधी 400 वर होती आणि आता ती 40 च्या घरात आहे. तर यावेळी त्यांचे 4 चं येतील असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.