'मी खुद्दार, हा 10 वर्षातला सर्वात मोठा जोक'; सुषमा अंधारेंचा शिंदेवर हल्ला

‘मी खुद्दार, हा 10 वर्षातला सर्वात मोठा जोक’; सुषमा अंधारेंचा शिंदेवर हल्ला

| Updated on: Mar 20, 2023 | 10:01 AM

अंधारे यांनी, त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोकचं उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड असल्याचं म्हटलं आहे

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी खेडमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ही सभा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या खेडमधील झालेला सभेला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात होतं. या सभेत शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत टीका करताना, मी गद्दार नसून खुद्दार आहे असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, अंधारे यांनी, त्यांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोकचं उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या 10 वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद असल्याचा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

Published on: Mar 20, 2023 10:01 AM