मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान
मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी परळीतील आझाद चौकात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला होता. रात्री सुमारे पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला होता
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या छातीला मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर लातूरला उपचार सुरू होते. मात्र अधिक काळजीसाठी आणि उपचारांसाठी मुंडे यांना मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. यादरम्यान त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय चर्चांना उत आला आहे.
मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी परळीतील आझाद चौकात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला होता. रात्री सुमारे पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला मार लागला होता. त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलेलं होतं.
आता मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात धनंजय यांच्यावर उपचार सुरु आहेत. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करुन त्यांच्याशी गप्पा मारल्या. धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती त्यांनी डॉक्टरांकडून जाणून घेतली.