महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड; राऊतांवर शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. तर तुमच्या विमानात गुंड, मवाली बसले होते. त्याचे फोटो आज प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शुद्ध करण्यासाठी शरयूला घेऊन गेला होता का? असा सवाल संजय राऊत यांनी केला
सोलापूर : अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. तर तुमच्या विमानात गुंड, मवाली बसले होते. त्याचे फोटो आज प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शुद्ध करण्यासाठी शरयूला घेऊन गेला होता का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर काय झाडी, काय हाटील, काय डोंगार फेम आमदार शहाजी पाटील यांनी पलटवार करताना, महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळ्यात मोठा गुंड म्हणून संजय राऊतांचे नाव घ्यावे लागेल अशी टीका केली आहे. कारण त्यांनी अडीच वर्षांपूर्वी अशी गुंडगिरी, अशी चोरी केली की, शिवसेनेचे 40 ते 55 आमदार पवार साहेबांना झोळीत टाकली आम्हाला ते कळलं सुद्धा नाही. खरा गुंड, खरा चोर हा माणूस अशी टीका केली आहे.
Published on: Apr 10, 2023 03:03 PM
Latest Videos