रोहित पवारांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने फोन केले; अजित पवारांकडे बोट दाखवत म्हस्के यांची टीका
म्हस्के यांनी, क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न झाला असा गौप्यस्फोट केला. तर यासाठी अजित पवारांनी सगळ्यांना फोन केले असा दावा केलेला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. त्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच रोहित पवार यांच्यावरून अजित पवार यांच्यावर निशाना साधत आधी आपल्या घरात बघा. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करा असेही म्हटलं आहे.
म्हस्के यांनी, क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न झाला असा गौप्यस्फोट केला. तर यासाठी अजित पवारांनी सगळ्यांना फोन केले असा दावा केलेला आहे. म्हस्के यांनी, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते. अजित पवार यासाठी अजित पवारांनी सगळ्यांना फोन करत होते. मात्र निवडणूक झाली ही आणि रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले ही. त्यामुळे आधी आपलं बघा, आपल्या घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न असा घणाघात म्हस्के यांनी केला आहे.