मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 'राऊत' यांची चौकशी, काय म्हणाले पाहा मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘राऊत’ यांची चौकशी, काय म्हणाले पाहा मुख्यमंत्री?

| Updated on: Sep 16, 2023 | 11:25 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यावरुन खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली. कॅबिनेटच्या बैठकीमुळे मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी सर्व हॉटेल बुक करण्यात आले. हा खर्च कोण करतंय असा सवाल राऊत यांनी विचारला होता.

संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मात्र, संजय राऊत यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत जाणार असल्याचं म्हटलं आणि वेगळीच चर्चा सुरु झाली. मात्र, पत्रकार परिषदेत राऊत आले नाहीत. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी टोला लगावण्याची संधी काही सोडली नाही. पत्रकार परिषद सुरु असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत नाही आले का? असा मिश्कील टोला लगावला. त्यावर संजय राऊत यांनी शिंदे यांच्या मनात माझी धाकधूक असेल, शेवटी भूताटकी असे म्हणत पलटवार केला. विशेष म्हणजे संजय राऊत संभाजीनगरमध्येच होते. पत्रकार परिषदेत येतो की काय म्हणून आपल्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनीही मी ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारणार असा इशारा दिला.

Published on: Sep 16, 2023 11:25 PM