विरोधकांनी त्यांची पोटदुखी 'आपला दवाखाना'तून...,' काय म्हणाले  मुख्यमंत्री

विरोधकांनी त्यांची पोटदुखी ‘आपला दवाखाना’तून…,’ काय म्हणाले मुख्यमंत्री

| Updated on: Mar 09, 2024 | 6:49 PM

डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील कामे झटपट होत आहेत. राज्यात 700 आपला दवाखाने तयार करण्यात आले आहेत. आपण स्वत: सामान्य कुटुंबातील असल्याने आपल्याला लोकांच्या समस्या लवकर समजतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील सभेत बोलताना स्पष्ट केले.

सातारा | 9 मार्च 2024 : राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने वेगाने विकास होत आहे. राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्याचे काम वेगाने सुरु असून एकूण 700 दवाखाने सुरु झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथील एका कार्यक्रमात सांगितले. राज्यातील कामे पाहून विरोधकांना जर पोटदुखी झाली असेल तर त्यांना ‘आपला दवाखाना’ मधून मोफत उपचार मिळतील अशी टोमणा एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. इरसालवाडीत दरड कोसळली तेव्हा आपण स्वत: डोंगर चढून पाहणी करायला गेलो होतो. आज तेथील घरे पाहा तशीच घरे पाटण येथील दरडग्रस्तांना मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या दुर केल्या जात आहेत. आशा वर्कर्सनाही हे सरकार निराश करणार नाही, मोदी सरकार आतापर्यंत आपली कोणतीही योजना नामंजूर केली नाही. आपल्या प्रत्येक प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Published on: Mar 09, 2024 06:48 PM