'इतकी वर्षे संधी होती तरी मराठा...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे

‘इतकी वर्षे संधी होती तरी मराठा…,’ काय म्हणाले एकनाथ शिंदे

| Updated on: Feb 27, 2024 | 1:18 PM

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले आहे. तरी काही लोक हे टिकणारे आरक्षण नाही असे बोलत आहेत. ते कशाच्या आधारावर बोलत आहेत असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने एक विण्डो ठेवली होती. पॅरा 550 त्याआधारे अतिशय अपवादात्मक परिस्थिती 50 टक्क्यांच्या वरती आरक्षण देता येते असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले आहे. माथाडी, मापाडी, अल्प भुधारक, लॅण्डलेस आहे, डब्बेवाले आत्महत्याग्रस्त आहेत. या सर्व मागास आहेत. मराठा समाज मागास आहे हे माहीती असताना देखील त्यांना इतकी वर्षे आरक्षण दिले नाही. मराठा समाजाच्या जीवावर अनेकजण मोठे झाले. आता आम्ही मराठा समाजाला 10 टक्के दिले तर ते टिकणारे नाही असा दावा केला जात आहे तो कशाच्या आधारे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळ अधिवेशनात केला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी आधी केवळ मराठवाड्यातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Published on: Feb 27, 2024 01:16 PM